कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑वेताळबांबर्डे घरफोडीप्रकरणी संशयितास अटक.

*🛑वेताळबांबर्डे घरफोडीप्रकरणी संशयितास अटक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- १८:-* कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील दोन बंद घरे फोडून आतील चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या संशयिताला पकडण्यात कुडाळ पोलिसांना यश आले. रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी (३०, रा.आकेरी घाडीवाडी) या चोरट्याने ही चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी ताब्यात घेत अटक केली.

वेताळबांबर्डे येथील दोन बंद घरे अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना दोन महिन्यांनंतर, १३ नोव्हेंबरला घरमालक मुंबई येथून गावी आल्यानंतर उघडकीस आली होती. घरमालक सचिन सुरेश बांबर्डेकर व त्यांचा चुलत भाऊ तुकाराम लवू तेली हे दोघे वेताळबांबर्डे येथील असून कामानिमित्त मुंबईला असतात. सचिन बांबर्डेकर २ सप्टेंबर, रोजी आपले राहते घर बंद करून बोरीवली-मुंबई येथे गेले होते. ते जत्रोत्सवाला गावी आल्यानंतर ही दोन्ही घरे फोडल्याचे निदर्शनाला आले होते. या घरांच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंयडा

कटावणीसारख्या हत्याराने तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. दोन्ही घरातील चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून २३ हजार ४५० रु.चा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कृष्णा परूळेकर करीत आहेत. काही दिवसांपूर्वी कुडाळ हायस्कूलसमोरील रस्त्यावर सराईत चोरटा रामचंद्र उर्फ अभय घाडी हा चालत जात असताना गस्तीवर असलेल्या कुडाळ पोलिसांना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याकडील पिशवीत चांदी सापडली होती. याबाबत पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे वेताळबांबर्डे चोरीप्रकरणी रामचंद्र घाडी याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला. त्यादृष्टीने श्री. परुळेकर यांनी तपास सुरू केला. त्यात संशयिताचाच हात असल्याचे स्पष्ट झाले.सोमवारी त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यानंतर येथील न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!