कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी रुजू; सामाजिक संस्थांकडून भव्य स्वागत.

*🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी रुजू; सामाजिक संस्थांकडून भव्य स्वागत.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १५:-* अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या जनहित याचिकेनंतर अखेर शासनाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या मागणीला यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयातील आरोग्यसेवा आता अधिक सक्षम होणार आहे.

*संस्थांचे दमदार स्वागत, डॉक्टरांना पाठबळाची ग्वाही*

नवनियुक्त डॉक्टरांचे सामाजिक संस्थांकडून पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

यामध्ये अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, युवा रक्तदाता संघाचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्यासह तुषार विचारे, राजू केळुसकर, किशोर चिटणीस, अमित अरवारी, विनोद वालावलकर आदींचा सहभाग होता.रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. वजराटकर, डॉ. चौगुले आणि समुपदेशक सुनील सोन्सुरकर उपस्थित होते.

*सावंतवाडीकर प्रेमळ, सेवा करणाऱ्यांच्या पाठिशी उभे’ — संस्थांचा संदेश*

कार्यक्रमात बोलताना सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना विश्वास दिला—“सावंतवाडीची जनता प्रेम देणारी आहे. सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ही जनता भक्कमपणे उभी राहते. कुणालाही त्रास होणार नाही; काही गैरसोय वाटली तर हक्काने हाक द्यावी.”या आश्वासनाने डॉक्टरांमध्ये समाधान आणि प्रेरणा दिसून आली.

*नवे रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी*

• डॉ. बाळासाहेब नाईक

• डॉ. अलफान आवटे

• डॉ. ओंकार कोल्हे

• डॉ. विघ्नेश चाकोरे

• डॉ. गोपाळ गोटे

• डॉ. प्रिया वाडकर

• डॉ. क्रांती जाधव

• डॉ. श्लोक हिरेमठ

• डॉ. टी. कगनुलकर

सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले. डॉक्टरांनीही यावेळी रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्याचे आणि उपलब्ध सोयींचा सर्वोत्तम वापर करण्याचे आश्वासन दिले.

*वैद्यकीय अधीक्षकांचा गौरवोद्गार*

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऐवळे यांनी अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या सातत्यपूर्ण आरोग्यविषयक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या संस्थांचे सहकार्य नेहमीच उपयुक्त ठरते; आम्ही आभारी आहोत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक सुनील सोन्सुरकर यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!