आणखीकोकण

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर*

*मोठ्या गटात बाल गणेश मीत्र म़डळ वेंगुर्ला प्रथम,द्वितीय क्रमांक : दुर्गेवेडे, नाबरवाडी,तृतीय क्रमांक :आईकेळबाई मित्रमंडळ कुडाळ*

*बाल गटात निधी शिर्के प्रथम,अभिराज कुडतरकर व्दितीय,तर तृतिय स्वरा परब*

सावंतवाडी/सिंधुदुर्ग :
कोकणातील दिवाळी म्हटलं की प्रकाश, पारंपरिक उत्साह आणि सामाजिक एकोप्याची एक सुंदर सांगड… आणि याच परंपरेला पुढे नेण्यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य किल्ले स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली होती. परंपरा, इतिहास आणि शिवकालीन वारसा जपणाऱ्या या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, कोकणातील लहानग्यांपासून ते तरुण मंडळांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
*इतिहास जपणाऱ्या किल्ल्यांना मोठा प्रतिसाद*
आजच्या झगझगीत फटाक्यांच्या, शॉपिंगच्या आणि आधुनिक साजशृंगाराच्या युगातही मुलांनी केलेले परिश्रम, किल्ल्यांचा अभ्यास आणि त्यातले सूक्ष्म तपशील पाहून परीक्षकही थक्क झाले. शिवछत्रपतींचे धैर्य, स्वराज्याची संकल्पना आणि कोकणातील संस्कृतीची पायाभरणी करणारा वारसा ज्या जिव्हाळ्याने या स्पर्धेत मांडला गेला, तो अभिमानास्पद आहे.
*मोठा गट – विजेते*
प्रथम क्रमांक : बालगणेश मित्रमंडळ, वेंगुर्ला,द्वितीय क्रमांक : दुर्गेवेडे, नाबरवाडी,तृतीय क्रमांक : आईकेळबाई मित्रमंडळ
*उत्तेजनार्थ :*
अमित होडावडेकर,अर्जुन गावकर (मळगाव)शिवानी बांदेकर
*छोटा गट – विजेते*
प्रथम क्रमांक : निधी बाळकृष्ण शिर्के
द्वितीय क्रमांक : अभिराज कुडतरकर
तृतीय क्रमांक : स्वरा परब
*उत्तेजनार्थ*:
पार्थ मिशाळ,विष्णू गुरव,तनिष्क निर्मळे,विहान विनोद गवस
*कोकण लाईव्ह कडून विजेत्यांचे अभिनंदन*
स्पर्धेत सहभागी सर्व मंडळे, पालक आणि लहानग्यांनी दाखवलेली कल्पकता आणि समाजप्रबोधनाची भावना कौतुकास्पद आहे. किल्ले बनवताना मुलांनी केवळ स्पर्धा नाही तर इतिहास, पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याच्या संस्कारांची शिकवण जपली. आजच्या पिढीमध्ये शिवचरित्राची ओळख आणि राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारे अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
*किल्ले स्पर्धा : फक्त मनोरंजन नाही, संस्कारांची शाळा*
किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचं काम कोकणातील मुलं आणि तरुण मंडळे करत आहेत, ही समाजासाठी सकारात्मक दिशा आहे. मोबाइलच्या आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकणाऱ्या पिढीला सर्जनशीलता, टीमवर्क, परिश्रमाची किंमत आणि पारंपरिक कला शिकवणारा हा उपक्रम पुढील काळातही प्रेरणादायी ठरेल.कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलतर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
कोकणातील संस्कृती, परंपरा आणि वारसा जपण्यासाठी अशाच उपक्रमांना आम्ही सदैव प्रोत्साहन देत राहणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!