कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी १७ रोजी मोर्चा !

*🛑शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी १७ रोजी मोर्चा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. न्यायालयीन आदेशानुसार सुरू करण्यात आलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून बंद केली. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सोमवार १७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना २४ वर्षानंतर मिळणाऱ्या लाभांनुसार त्यांची वेतन निश्चिती पे मॅट्रिक्स एस-४ मध्ये न करता पूर्वीप्रमाणे एस-५ मध्येच करण्यात यावी, माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०-२०-३० वर्षांनंतरचा लाभ तात्काळ लागू करावा. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावरं विनाअट पदोन्नती देण्यात यावी. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा. माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने नकरता पूर्वीप्रमाणे नियमित वेतनश्रेणीत करण्यात यावी. तसेच माध्यमिक शाळातील वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहायक, ग्रंथपाल अतिरिक्त झाल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत वेतनास व वेतनश्रेणी शिक्षकेतर संरक्षण मिळावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लिपिक, प्रयोगशाळा सहायक, ग्रंथपाल, शिपाई यांच्या वेतनातील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात. शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जित रजा साठवण्याची मर्यादा काढून टाकावी. या मागण्यासाठी शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वात १७ नोव्हेंबर रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची पूर्वतयारी सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात केली जात आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, जिल्हाध्यक्ष अनिल राणे, जिल्हा उपाध्यक्ष लाडू जाधव, सचिव गजानन नानचे, वैभव केंकरे, सचिव श्री. कानसे आदींनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!