कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑संदीप परब यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान.

*🛑संदीप परब यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ०८:-* प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांची प्रेमाने काळजी घेतली पाहिजे.आई-वडील, आजी-आजोबा हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहेत. तसेच अन्न ही आपल्या श्रमाची आणि निसर्गाची देण आहे. त्याचा अपव्यय होऊ नये,असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लावण्यवती प्रभाकर परब यांनी केले.

रस्त्यावरील निराधार आणि वंचित बांधवांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या समाजसेवेच्या कार्याचा गौरव म्हणून कोकण एनजीओ इंडियातर्फे संदीप परब यांना ‘समाजगौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते अविनाश नारकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी पद्मश्री मुरलीकांत पेटकर (जागतिक कीर्तीचे पॅरालिंपिक जलतरणपटू), कोकण एनजीओ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद कुबल, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान संरक्षण क्षेत्र, ग्रामीण विकास, कला-संस्कृती, आरोग्य, युवा उद्योजकता आणि समाज प्रबोधन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कोकण एनजीओ इंडिया ही संस्था देशभरातील वंचित घटकांचे शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्यावतीने दादर येथे ‘कोकण कला महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा पार पडला.

जीवन आनंद संस्था ही रस्त्यावरच्या निराधार बांधवांसाठी पुनर्वसन, अन्नदान, तसेच मानसिक आरोग्य जनजागृती यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि स्वयंसेवक शैलेंद्र कदम उपस्थित होते. समाजसेवा हीच खरी पूजा आहे. ज्येष्ठांचा सन्मान आणि अन्नाचे जतन हाच माझा ‘जीवन आनंद’ आहे.”

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!