कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी कारागृह भिंत उभारणीसाठी ४ कोटी मंजूर.

*🛑सावंतवाडी कारागृह भिंत उभारणीसाठी ४ कोटी मंजूर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडीतील संस्थानकालीन वारसा असलेल्या जिल्हा कारागृहाच्या भिंत उभारणीसाठी ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये अंदाजित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पावसात कोसळलेली कारागृहाची भिंत आता उभारण्यात येणार आहे. संपूर्ण कारागृहाची धोकादायक झालेली भिंत आता उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पावसाळ्यामध्ये कोसळल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या संरक्षक भिंतीचे शासनाने स्टक्चलर ऑडिट केले होते. सदरची भिंत सुमारे १४३ वर्ष जुनी असल्याने सदर संरक्षण भिंतीला ठिकठिकाणी भेगा गेल्याने जीर्ण झालेली असून ती पाडून नव्याने आर. सी. सी. भिंत बांधण्याबाबत अहवाल सादर केला होता. आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांनी तसा परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह अप्पर पोलीस महांसचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र-पुणे यांच्याकडे सादर केला. राज्याच्या गृह विभागाने ४ कोटी ४ लाख ८० हजार २१६ रुपये एवढ्या रकमेच्या कामास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सदर काम मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आमदार केसरकर यांनी आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!