🛑 वेंगुर्लेत दिव्यांग पडताळणी शिबिरास उत्सुर्फ प्रतिसाद..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ला, दि-०७:- दिव्यांग बांधवांना UDID( unique disability ID) कार्ड तालुकास्तरावर उपलब्ध व्हावे व दिव्यांग पडताळणी व्हावे या उद्देशाने शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दिव्यांग पडताळणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे पार पडले.
या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग मधून नेत्ररोग तज्ञ डॉ जोशी, अस्थिरोग डॉ निखिल अवधूत, कान नाक घसा डॉ शाम राणे , ऑडिओलॉजिस प्रवीण पाटील, स्पीच थेरपिस्ट श्रीधर पोवार, फिजिओथेरपिस्ट योगिता शिंदे, सायकॉलॉजी समुपदेशक रेश्मा भाईप, विजय जाधव हे उपस्थित होते, तसेच तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथील स्टाफ उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत , डॉ निखिल अवधूत, साहस प्रतिष्ठान च्या अध्यक्षा श्रीमती रुपाली पाटील व दिव्यांग लाभार्थी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन ने झाली. दीपप्रज्वलनंतर डॉ संदीप सावंत यांनी या शिबिराचे उद्देश या विषयी माहिती दिली तसेच जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी तपासणी करून , सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या शिबिरासाठी वेंगुर्ला तालुक्यातून 150 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी व पडताळणी करून त्यांना UDID प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याविषयी पूर्तता करण्यात आली. सदर शिबिरामध्ये उपस्थित दिव्यांग बांधवांना अल्पोपहरची सोय साहस प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी वेंगुर्ला तहसीलदार श्री ओंकार ओतारी, तालुका आरोग्य अधिकारी श्री रवींद्र लिलाके, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत, सर्व वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयीन कर्मचारी व तहसीलदार ऑफिस मधील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार श्री सौदागर यांनी व्यक्त केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

