*कार्यकुशल आमदार निलेश राणे यांचा विजय!आकारीपडचा प्रश्न लागला मार्गी*
*कार्यकुशल आमदार निलेश राणे यांचा विजय!आकारीपडचा प्रश्न लागला मार्गी*
*कुडाळच्या माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा — शासनाने परत दिली आकारीपड जमीन*
कुडाळ, दिह२८ :
कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. अनेक दशकांपासून शासन ताब्यात असलेली हजारो हेक्टर आकारीपड जमीन अखेर पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच काढलेल्या जीआरनुसार बाजारमूल्याच्या फक्त ५ टक्के रक्कम शासनाकडे जमा केल्यास जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात येईल.जमिनीचा वापर केवळ कृषी उद्देशासाठीच करता येईल.आणि महत्त्वाचं म्हणजे, पुढील ५ वर्षे ती जमीन विकता किंवा वापर बदलता येणार नाही.
या निर्णयामुळे माणगाव खोऱ्यातील सुमारे २८ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, हा निर्णय कुडाळ-मालवणचे आमदार सन्माननीय निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फळ मानले जात आहे.
निलेश राणे यांनी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा प्रश्न शासनदरबारी ठामपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी शेतकऱ्यांना न्याय देणारा हा निर्णय घेतला.
स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार राणे यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुन्हा एकदा जमिनीचा मालकीहक्क येणार असून, त्यांच्या शेतीचा आणि उपजीविकेचा मार्ग खुला झाला आहे.
*आमदार निलेश राणे म्हणाले* :
> “शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जमीन परत मिळावी, हा आमचा ध्यास होता. शासनाने दिलेला हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेलं यश आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशाच प्रकारे प्रयत्नशील राहू.”
*थोडक्यात : निर्णयाचे महत्त्व*
माणगाव खोऱ्यातील २८ गावांचा समावेश,हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार,शासनाकडे बाजारमूल्याच्या फक्त ५% रक्कम जमा करावी लागणार
जमीन शेतीसाठीच वापरण्याची अट
५ वर्षे विक्री किंवा वापर बदलावर बंदी
*शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटली आशा*
या निर्णयामुळे माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. गेल्या अनेक दशकांपासून शासनाच्या ताब्यात गेलेल्या जमिनी परत मिळाल्याने आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या भूमीवर पुन्हा एकदा शेती करण्याची संधी मिळणार आहे.

