करुळ घाटातील नाका चुकविण्यासाठी बीनापास वाहतूक करणारे भुईबावडा मार्गे प्रवास करतात त्यामुळे या मार्गात पोलिस बंदोबस्त वाढवा, अथवा तात्पुरता तपासणी नाका सुरू करा ; आमदार नितेश राणे
_*🛑 करुळ घाटातील नाका चुकविण्यासाठी बीनापास वाहतूक करणारे भुईबावडा मार्गे प्रवास करतात त्यामुळे या मार्गात पोलिस बंदोबस्त वाढवा, अथवा तात्पुरता तपासणी नाका सुरू करा ; आमदार नितेश राणे*_
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय शेळके*
*🎴वैभववाडी, दि-०४ :-* पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी करूळ व भुईबावडा हे दोन प्रमुख घाट मार्ग आहेत. करूळ घाट मार्गात पोलीस तपासणी नाका आहे. लाँकडाऊनमुळे जिल्हा बंदी असताना बरेचजण बिनापास भुईबावडा मार्गे बिनधास्त प्रवास करत आहेत. कोरोना वाढीस ही चोर मार्गे सुरू असलेली वाहतूक कारणीभूत आहे. या मार्गात पोलिस बंदोबस्त वाढवा, अथवा तात्पुरता तपासणी नाका सुरू करा अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी संपर्क साधत केली. श्री. दाभाडे यांनी लवकरच घाटात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल असा शब्द नितेश राणे यांना दिला आहे.
वैभववाडी पं.स.सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांनी भुईबावडा घाट मार्गाचा मुद्दा उपस्थित केला. करुळ घाटातील नाका चुकविण्यासाठी बीनापास वाहतूक करणारे भुईबावडा मार्गे प्रवास करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. हा मार्ग बंद करा अथवा मार्गात पोलीस बंदोबस्त वाढवा अशी मागणी साठे यांनी केली.
आमदार नितेश राणे यांनी बैठकीतून पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला. व उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या. श्री दाभाडे यांनी पोलिस बंदोबस्त वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.